1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 5 मे 2024 (15:06 IST)

अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी घेतली मनोज जरांगेची सदिच्छा भेट

jay pawar
facebook jay pawar
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सध्या देशात प्रचार सभा घेतल्या जात आहे. अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी आज मनोज जरांगे पाटीलांची आज भेट घेतली. या वेळी जय पवारांनी त्यांचा सत्कार केला.

आज सकाळी अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार मुंबईहून हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजी नगरला पोहोचले नंतर ते कार ने अंतरवली सराटी येथे पोहोचले आणि तिथे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेतली.या वेळी दोघांमध्ये काही विशेष चर्चा झाली नाही.

दोघांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भात जय पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. सध्या मराठा समाज आणि ओबीसी नेता भुजबळांवर नाराज आहे. याचा फटका निवडणुकीत राष्ट्रवादीला बसू नये या साठी ही भेट घेतल्याचं समजलं जात आहे. जय पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या बारामतीहून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. 

भेटी नंतर जय पवार मुंबईसाठी रवाना झाले. या भेटी बाबतची माहिती  जय पवारांनी कोणालाही दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 
 
Edited By- Priya Dixit