मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 24 एप्रिल 2024 (11:30 IST)

हिजाबवाली महिला भारताची पंतप्रधान बनावी, माझे स्वप्न आहे ओवेसी म्हणाले

AIMIM नेता असदुद्दीन ओवेसी पाच दिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत या दिवसांमध्ये किशनगंजमध्येते कॅप करत आहे. AIMIM ने किशनगंज लोकसभा क्षेत्रामधून अख्तरूल इमानला आपले उमेद्वार बनवले आहे. याकरिता असदुद्दीन ओवेसी इथे निवडणूक प्रचार करित आहे. तसेच जनतेला मत द्या म्हणून अपील करीत आहे. या दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी एक मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, काहीही होऊ दे, आम्ही नकाब, हिजाब, चादर सोडणार नाही. असदुद्दीन ओवेसीचे स्वप्न आहे की, हिजाब परिधान केलेली महिला भारताची पंतप्रधान बनावी. 
 
असदुद्दीन ओवेसी मंगळवारी रौटा मध्ये आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, माझे स्वप्न आहे देशाची पंतप्रधान हिजाबवाली महिलाच बनावी. तसेच ते म्हणालेत की, आम्ही हिजाब, नकाब, चादर कधीच सोडणार नाही. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, भाजपने आमच्या आई-बहिणींच्या डोक्यावर हिजाब काढून टाकण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा येथील सांसद जावेद काही बोलले नाही. पण आम्ही याचा विरोध करतो. 
 
किशनगंज मधून एनडीए ने जेडीयू च्या मुजाहिद आलम यांना आपले उमेदवार बनवले आहे. तेच महागठबंधन मधून काँग्रेसचे निर्वतमान सांसद मोहम्मद जावेद प्रत्याशी आहे. जेव्हा की, अख्तरूल इमानला असदुद्दीन ओवेसीने आपला पक्ष AIMIM मधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. किशनगंज मध्ये स्पर्धा त्रिकोणीय दिसत आहे. सध्या सर्व उमेद्वार आपल्या निवडणूक प्रचारामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करीत आहे. या दरम्यान बिहारच्या 5 जागांसाठी लोकसभा मतदान होईल ज्यामध्ये कटिहार, पूर्णिया, भागलपूर, बांका, किशनगंज सहभागी आहे. 

Edited By- Dhanashri Naik