गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2024 (09:45 IST)

'या' बड्या नेत्याने दिला भाजपचा राजीनामा

Dhairyasheel Mohite Patil
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत दाखल होत आहे. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माढा लोकसभा मतदार संघात संघर्ष वाढल्यानंतर भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुरुवारीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते यांनी भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना १० एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते. भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.
 
दरम्यान माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजीत सिंह निंबाळकर यांना महायुतीचे उमदेवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांनी गुरुवारी पुणे शहरात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले. आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत.
 
उद्या शनिवारी धैर्यशील मोहिते पाटील अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. ते माढा लोकसभा मतदार संघातून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor