शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2024 (13:34 IST)

तुम्ही सन्मानाने जगायला शिकवले, BSP अध्यक्ष मायावतींच्या निर्णयावर पुतण्या आकाश आनंदची प्रतिक्रिया

Mayawati
बसपा अध्यक्ष मायावतीच्या निर्णयावर त्यांचाच पुतण्या आकाश आनंद याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आकाशाला पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी उत्तराधिकारी बनण्याचा निर्णय मागे घेतला आहे.  
 
ऊत्तर प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांच्या निर्णयावर त्यांचा पुतण्या आनंद यांनी मौन सोडले. व आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मायावती यांनी पहिले अक्ष यांना लोकसभा निवडणूक प्रचार करण्यासाठी रोखले. 
 
आता त्यांना पार्टीच्या नॅशनल को-ऑर्डिनेटर पदावरून काढून टाकण्यात आले आहे. सोबतच त्यांना आपला उत्तराधिकारी बनवण्यासाठी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयावर आकाश आनंदने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आकाश आनंद म्हणाले की, मायावतीजी तुम्ही सर्वसामान्य नेता आहात .तुम्ही बहुजन समाजासाठी आदर्श आहात तुम्हाला देशभरातील बहुजन समाजलोक पूजतात तुमच्या संघर्षामुळे बहुजनसमाजाला पॉलिटिकल पॉवर मिळाली आहे. तुम्हीच सन्मानाने जगायला शिकवले. तुमचा आदेश कपाळावर आहे. मी भीम मिशन आणि बहुजन समाजसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. आकाश बसपा प्रमुख मायावती यांचे छोट्या भावाचा मुलगा आहे. यांना मायावतीने 10 डिसेंबर 2023 ला बहुजन समाज पार्टीचे को-ऑर्डीनेटर बनवले होते आणि आपले उत्तराधिकरी घोषित केले होते. पण 6 महिन्यात त्यांनी आपले दोघीही निर्णय बदलले. 
 
मायावतींनी आपला पुतण्या आकाश यावर एका वक्तव्यामुळे नाराज झाल्या. सीतापूर मध्ये बहुजन समाज पार्टीची रॅली झाली होती. या रॅली मध्ये आकाश आनंद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत पार्टीला आतंकवादी संबोधले. या टीकेचा भाजपने विरोध केला आणि विरुद्ध FIR दाखल केली. यामुळे मायावती नाराज झाल्या. त्यांनी आकाशला प्रचार कारण्यापासून थांबवले. तसेच या निर्णयांनी त्यांना पार्टीमधून वेगळे केले. 

Edited By- Dhanashri Naik