वंचित बहुजन आघाडी आणि आप सोबत निवडणूक लढविण्याची शक्यता
वंचित बहुजन आघाडी आता ‘आम आदमी पक्षा’सोबत निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या चर्चा यशस्वी ठरल्यास ‘आप’ वंचितच्या गोटात सहभागी होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काही प्रमुख पदाधिकारी यांची ‘आम आदमी पक्षा’च्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक झाली. दादरमधील आंबेडकर भवनात झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ‘आप’चे नेते अरविंद केजरीवालही या युतीस अनुकूल आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ‘आप’ वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.