शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (15:39 IST)

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम

अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी स्वतः काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही कोणताही फरक झालेला नाही. काँग्रेस अजूनही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशीही आम्ही बोललो. त्यातून काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा राहिलेली नाही.”
 
काँग्रेससोबत युती करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे स्पष्ट करतानाच आंबेडकरांनी एमआयएमबाबत बोलणे सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “एमआयएमसोबत युतीसाठी बोलणी सुरू आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे. ओवेसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे.