शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (16:03 IST)

शिवसेनेचा वाचननामा लवकरच या दहा गोष्टी असतील त्यात

These ten things will be in the Shiv Sena readings soon
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील महत्वाचा पक्ष असलेला शिवसेना आपला निवडणूकपूर्व 'वचननामा' शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित करणार आहे. शिवसेनेच्या या  वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस असणार आहे. दरम्यान प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून दिले जात असलेले दहा रुपयांत जेवणाचे 'वचन' यात दिले जाण्याची शक्यता आहे.  मात्र सत्तेत आल्यावर किती वचन पूर्ण होतात हे तेव्हाच कळेल सोबतच आरे येथील झालेली वृक्ष तोड यामुळे मुंबईतील नागरिक संतप्त आहेत, याचा फटका देखील शिवसेनेला बसण्याची दाट शक्यता आहे. 
हे आहेत प्रमुख आश्वासने : 
१) फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी.
२) विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये विशेष सवलत.
३) वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
४) महिला सक्षमीकरणावर भर.
५) कृषी उत्पन्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना.
६) उद्योग व्यापारावाढीसाठी विशेष योजना.
७) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना.
८) शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना.
९) शहरांच्या विकासासाठी विशेष योजना.
१०) रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना.