महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  धन-संपतीची माया सर्वांनाच असते. धन प्राप्तीसाठी लोकं वेगवेगळे प्रयत्न करत असतात. अशात शिवरात्रीच्या दिवशी गणपतीचा खास उपाय करून या इच्छा फलीभूत करता  येऊ शकतात. यंदा महाशिवरात्री 21 फेब्रुवारी, शुक्रवारी आहे. शुक्रवार धनाची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शिवरात्रीला शिव पूजन करण्यापूर्वी त्यांचे पुत्र गणपतीची पूजा  करण्याची परंपरा आहे. महादेवांनी स्वयं त्यांना अग्र पूजा अधिकारी केले आहे. म्हणून सर्वप्रथम गणपती पूजन करावे आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देखील ही संधी  शुभ आहे.
				  													
						
																							
									  
	 
	शिवरात्री पूजन पूर्वी कच्च्या दोर्याला सात गाठी लावून देवाच्या चरणी ठेवा. चौथ्या पहरमध्ये पूजा समाप्त झाल्यावर तो दोरा आपल्या पर्समध्ये ठेवा. हा उपाय केल्याने नेहमी  पैशांची भरभराटी राहील. धन-धान्य भांडार देखील भरलेले राहतील.
				  				  
	 
	वास्तुशास्त्रांप्रमाणे देखील धन संबंधी समस्या येण्यामागील कारण घरात किंवा दुकानात असणारे दोष असतात. अनेक गोष्ट नकळत घडतात. अशात आर्थिक समस्या दूर  करण्यासाठी शिवरात्रीला उत्तर दिशा ज्याला धन-संपत्तीचे द्वार मानले गेले आहे तेथे खाली लाल कापड पसरवून गणपती आणि देवी लक्ष्मीची यांच्या मुरत्या किंवा फोटो  ठेवावे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	गणपतीची मूर्ती महालक्ष्मीच्या मूर्तीच्या डावीकडे विराजित करावी. तेव्हाच पूर्ण फल प्राप्ती होईल.
				  																								
											
									  
	 
	या वस्तू ठेवा पर्समध्ये
	लाल रंगाच कागद, तांदूळ, गणपतीचा फोटो, पिंपळाचं पान, चांदीचा शिक्का, गोमती चक्र, रुदाक्ष.
				  																	
									  
	 
	या लेखामध्ये दिलेली माहितीचा आम्ही दावा करत नाही की ही माहिती पूर्णपणे सत्य किंवा अचूक आहे आणि या उपायांनी अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. हे उपाय अमलात  आणण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.