मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

मकर संक्रांती: हे धान्य दान करा

मकर संक्रांती दान, पुण्य आणि पूजेचा सण आहे. यादिवशी विशेष अन्न दान केल्याने काही विशेष ग्रह मजबूत होतात.
 
गहू आणि चणे
दोन्ही धान्य मजबुतीचे सूचक आहे. गहू आणि चणे दान केल्याने घरात स्थिरता येते. गहू सूर्याशी संबंधित धान्य आहे तसेच चणे गुरु बृहस्पती याशी संबंधित आहे. संक्रांतीला हे दान केल्याने भूमी लाभ आणि संतान लाभ होतो. व्यवसाय आणि नोकरीत स्थिरता येईल.

मंत्र : ॐ सूर्याय नमः
 
जव आणि तीळ
दोन्ही धान्य आनंदी जीवनाचे सूचक आहे. जव शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि तीळ शनी संबंधित आहे. हे धान्य दान केल्याने घरात खुशहाली येते आणि मेहनतीचे फल मिळते. घरात कोणत्याही प्रकाराचा अभाव राहत नाही और जीवनात रस येतो.
 
मंत्र : ॐ मार्तण्डाय नमः
 
तांदूळ आणि मूग
दोन्ही धान्य योग्य मार्ग आणि नात्यांचे आणि धनाचे सूचक आहे. तांदूळ चंद्रमा आणि मूग बुध ग्रहाशी संबंधित आहे. संक्रांतीला हे दान केल्याने व्यक्ती कधीही मार्गातून भरकटत नाही, योग्य दिशेला लागतो. बदनामी, चुकीची संगत आणि चुकीच्या कार्यांपासून वाचतो.
 
मंत्र : ॐ मित्राय नमः
 
बाजरी
हे तुटत असलेले नाते, विस्कटत असलेले वातावरण आणि आजरांवर प्रभाव टाकतं. बाजरीचा संबंध मंगळ आणि शुक्र ग्रहाशी असतो. संक्रांतीला बाजरी दान केल्याने घरातील ताण कमी होतो, आपसात प्रेम वाढतं. हे दान केल्याने आजार बरे होतात.
 
मंत्र : ॐ आदित्याय विद्द्माहे मार्तण्डाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयातः