शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (17:07 IST)

अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन

सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी सरकारनं न्यायालयात जोर लावावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आलं. बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरी उपस्थित नव्हते. 
 
आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मराठा समाजाला विविध प्रकारचे लाभ दिले जावेत. तसंच, आरक्षणाची आधीच सुरू झालेली प्रक्रिया बंद करू नये. त्यासाठी अध्यादेश काढावा. राज्यात कुठलीही नवी नोकरभरती केली जाऊ नये, अशा मराठा संघटनांच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मराठा संघटनांची अपेक्षा आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन  करण्यात आलं.