1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (17:23 IST)

मराठा क्रांती मोर्चा : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची हजेरी

Maratha Aarakshan

देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजी राजे हे आझाद मैदानात जाऊन सर्वसामान्य मोर्चेकऱ्यांसोबत बसले.

“मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.

“मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं आहे. ज्याप्रमाणे राज्यभरात 57 मोर्चे झाले, त्याप्रमाणे मुंबईतील हा 58 वा मोर्चे असेल. हा मोर्चाही शांततेत काढावा, आपला मेसेज जगाला द्यावा, जगाला हेवा वाटेल असा हा शेवटचा मोर्चा काढावा, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी’, असं आवाहन संभाजीराजेंनी शेवटच्या मोर्चाच्या निमित्ताने केलं.