शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (14:52 IST)

वैभव लक्ष्मी आरती मराठी

Lakshmi Devi
आरती लक्ष्मीची। वैभव सुखसंपत्तीची। 'गुरुदास-विष्णू' गाई दावी वाट वैभवाची। ।।ध्रु.।।
तिन्ही देवता या नामी। काली सरस्वती लक्ष्मी। विष्णू-पत्नी त्यांत साची। दावी वाट वैभवाची ।।1।।
कमळांत जन्म झाला। कमलजा म्हणजी तुला। अस्थिर तुला करते। बोंच पद्म परागांची ।।2।।।
येई तुला चंचलता। पायीं पराग बोचता। व्रताने तू होशी स्थिर। वर्षा करी वैभवाची ।।3।।
अलंकार सुवर्णाचे। तुझ्या फार आवडीचे। त्यांत वास आई, तुझा। म्हणूनी पूजा सुवर्णाची ।।4।।
इविलीशी सेवा करता। येई तुला प्रसन्नता। ध्य तुझ्या औदार्याची। दाविसी वाट वैभवाची ।।5।।
अनाथांची स्वार्थी भक्ती। तरी देण्या त्यांना मुक्ती। रंजल्या गांजल्यांना। दाविसी वाट वैभवाची ।।6।।
संध्याकाळी शुक्रवारी वाट तुझी सुखकारी। पाहताती भक्त त्यांना । दाविसी वाट वैभवाची ।।7।।
वैभवलक्ष्मीचे व्रत। सुवासिनी ज्या करीत। उन्नती करण्यात त्यांची। दाविसी वाट वैभवाची ।।8।।
शंका कुशंका त्यजून। ठेवोनिया स्वच्छ मन। करता सेवा, नारयणी। दाविसी वाट वैभवाची ।।9।।
मनोभावे करु सर्व। नको अहं, नको गर्व। लक्ष्मीपायी होता लीन। दाविल खूण वैभवाची ।।10।।
शरण आलो आम्ही तुज। तुज्या चरणींचे रज। कृपा करी प्रसादाची। करुन वर्षा वैभवाची ।।11।।
वैभव, सुखसंपत्तीची। 'गुरुदास-विेष्णू' गाई। दावि वाट वैभवाची। आरती लक्ष्मीची।।