मिथुन राशी भविष्यफल 2019
मिथुन राशीच्या २०१९ सालच्या भविष्यानुसार द्वितीयात राहू, षष्ठात गुरू नि सप्तमात शनी या ग्रहांचा वरोधी सूर आहे. पण शुक्र मंगळाच्या नवपंचम योगातून जुळणारे नवे समीकरण या अडचणी दूर करेल. या वर्षी अनेत बदल घडतील. ज्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तुमची भूमिका सकारात्मक ठेवलीत आणि येणार्या संधींचा योग्य वापर केला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. 2019 मध्ये मिथुन राशित राहणार आहे तर केतु धनु राशित, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशित आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करणार आहे. हे 10 एप्रिलला वक्री होवून 11ऑगस्टला मार्गी होणार आहे शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील.
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक स्तरावर या वर्षात स्वरस्थ्य अनुभवण्याचे प्रंग असे थोडेसेच प्रसंग असे थोडेसेच असतील. हा काळ सौख्यकारक राहील. या दरम्यान पूर्वी ठरलेले विवाह, वस्तुशांत यासरखे कार्यक्रम पार पडतील. नव्या जागेचे योग सप्टेंबरच्या सुमारास येतील. चतुर्थात प्रवेश करणारा मंगळ भाऊबंदकी, भांडणतंटे यांना आमंत्रण देणारा ठरणार आहे. एवढे मात्र खरे की श्रेष्ठ संयमापुढे ग्रहही माघार घेतील. शनी मंगळाचा होणारा केंद्रयोग फार काही त्रासदायक ठरणार नाही. तुमच्या सातव्या भावात शुक्राच्या नक्षत्रात बसलेला शनि तुम्हाला होणाऱ्या लाभाचा शुभ संकेत आहे. जीवनसाथी बरोबर असणाऱ्या संबंधात गोडवा पाहायला मिळेल. या वर्षी तुम्हाला जुळी संतती होण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवन चांगले व्यतीत होईल. तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. केतुच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकां साठी थोड्या अडचणी येतील. कारण केतु तुमच्या सप्तम भावाला पाहात आहे.
आरोग्य
या वर्षात तुमचे आरोग्य चांगले राहील. असे असले तरी क्वचित तुम्हाला आरोग्याच्या लहान-सहान कुरबुरींना सामोरे जावे लागेल. वर्षाच्या सुरुवातील, म्हणजेच जानेवारी महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या कालावधीत त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकते. चिडचिह आणि व्यर्थ चर्चा करू नका त्याने तुमचे मन अशांत होईल. आपले मनोरथ पूर्ण होईल. सकारात्मक बोलण्याची सवय ठेवा. शनी मंगळाचा होणारा केंद्रयोग फार काही आरोग्यासाठी त्रासदायक ठरणार नाही.
करियर
करिअरचा विचार करता हे वर्षा तुमच्यासाठी सामान्य असेल. पण तुम्ही मेहेनत घेतली तर मात्र या वर्षी करिअरमध्ये प्रगती करू शकाल. तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीत एकाग्र होण्याची आवश्यकता आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी तुम्हाला नव्या कल्पना तयार कराव्या लागतील. वरिष्ठांचा सल्ला हितकारक ठरेल. नोकरदार व्यक्तींनी येत्या वर्षात कष्टाची तयारी ठेवावी. वरिष्ठांच्या अपेक्षा वाढत राहिल्याने कामात एक प्रकराचा तणाव असेल, पण त्याचा फायदा कौशल्य आणि प्रावीण्य वाढविण्याच्या दृष्टीने निश्चितच होईल.
व्यवसाय
2019 सालच्या राशी भविष्यानुसार आर्थिक बाबतीत तुम्ही मोठी ध्येये साध्य कराल. आर्थिक लाभाची खूप शक्यता आहे. व्यवसायातील नव्या कल्पना तुमचा आर्थिक नफा वाढविण्यास मदत करतील. पैसा वसूल करण्यात तुम्हाला यश लाभेल. असे असले तरी तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरापासून लांब राहावे लागेल. मार्च पर्यंत व्यापार उत्तम चालेल. असफळताचा सामना करावा लागेल. अधिकतर
काळापर्यंत व्यापारात नफा होईल आणि तुम्हाला नवीन क्लाइंट मिळतील. लहान असो किंवा मोठा व्यापार लाभ अवश्य होईल. मार्च नंतर तुम्ही थोडी फार बचत करून आपला बैंक बैलेंस वाढवताल. पैशाची गुंतवणूक करू शक्ताल. याच्या आगोदर कुठल्या विशेषज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. तुम्हाला महिन्यातच नाही तर वर्षा नंतर आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशाचा लाभ होईल.
रोमांस
या वर्षी तुमची लव लाइफ सामान्य राहणार आहे. परस्पर संबंधात प्रेम वाढेल. प्रेम संबंधात मानसिक संतुष्टि मिळेल. या वर्षी दुसऱ्या धर्माच्या व्यक्ती वर प्रेम कराल. जोडीदाराला समजून घेणे हा एकमेव सुखाचा मार्ग ठरेल. मात्र मध्यस्थी नातेवाईकांशी सल्ला मसलत टाळा.
उपाय
रोज संध्याकाळी हनुमान चाळीसा वाचावी. शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. मार्च नंतर आपल्या घराच्या गच्ची वर पांढरा झंडा दोन वर्ष ठेवावा.