testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

2019 : मूलांक भविष्य, जाणून घ्या कसे राहील नवे वर्ष तुमच्यासाठी

numrology 1
Last Updated: बुधवार, 2 जानेवारी 2019 (12:30 IST)
मूलांक 1
मूलांक 1 असणार्‍यांसाठी 2019 उत्तम आहे. या वर्षी स्वत:मध्ये जबरदस्त ऊर्जा आणि शक्ती जाणवेल. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि आपल्याला मेहनतीचं फल मिळेल. आपण स्पर्धात्मक परीक्षा किंवा सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत असाल तर या वर्षी चांगले प्रयत्न करून यश मिळण्याचे प्रबल योग आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात देखील आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीत प्रमोशन किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. एकूण आपल्या प्रयत्नांमुळे जीवनात समृद्धी येईल आणि आपण प्रत्येक क्षेत्रात मग नोकरी असो वा व्यवसाय, नेहमी प्रगती कराल आणि विजयी व्हाल. तसेच या वर्षासाठी एक विशेष सल्ला आहे की जोशमध्ये होश गमावू नका. सोबतच यश आणि समृद्धी हाती लागल्यावर गर्विष्ठासारखे वागू नका. शासकीय विभाग, प्राधिकरण किंवा सरकारकडून लाभ प्राप्तीचे योग आहे म्हणून शासकीय सेवेत कार्यरत लोकांसाठी हे वर्ष लाभकारी होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये कौटुंबिक जीवनात काही काळासाठी त्रास सहन करावा लागू शकतो. या दरम्यान नातेवाईक किंवा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात म्हण अश्या परिस्थितीत शांती आणि धैर्य राखून ठेवावे.
numrology 2
मूलांक 2
मूलांक 2 असणार्‍यांसाठी वर्ष 2019 सामान्य असणार आहे. या वर्षी फायदा आणि नुकसान दोन्ही सामान्य आणि संतुलित राहील. चांगले परिणाम मिळवण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. आपण सिव्हिल सेवा, इंजिनियरिंग किंवा मेडिकल परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याला अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अभ्यास एकाग्रता ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपण नोकरीत असल्यास किंवा व्यवसायी असल्यास प्रगतीसाठी उत्तम प्रदर्शन करावे लागेल. एकूण कठीण परिश्रम 2019 साठी यश मिळवण्यासाठी मूलमंत्र सिद्ध होईल. प्रेम प्रसंग असल्यास या वर्षी रिलेशनमध्ये प्रेम वाढेल परंतू काही समस्यादेखील उद्भवू शकतात. पार्टनरच्या भावना समजून घ्यायला हव्या. आपण आपल्या पार्टनरला सुंदर पर्यटन स्थळी फिरायला घेऊन जाऊ शकता.
numrology 3
मूलांक 3
वर्ष 2019 मूलांक 3 असणार्‍यांसाठी उत्तम ठरेल. या वर्षी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश हाती लागेल. शिक्षा, धन लाभ, वैवाहिक जीवन आणि लव लाइफ चांगली राहील. आपण मेडिकल, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट किंवा सिव्हिल सेवेची तयारी करत असाल तर या वर्षी यश मिळण्याचे प्रबळ योग आहे परंतू सतत अध्ययन करणे गरजेचे आहे हे विसरत कामा नये. या वर्षी आपल्याला धन लाभ आणि शासकीय क्षेत्र, शासकीय विभाग किंवा सरकाराकडून लाभ प्राप्तीचे योग आहे. शासकीय क्षेत्रात कार्यरत लोकांसाठी हे वर्ष उत्तम राहील. नोकरी किंवा व्यवसायात मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन आणि व्यवसायात परदेशातील संपर्काहून लाभ होण्याची शक्यता आहे. एकूण 2019 आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. परंतू या दरम्यान यश मिळण्याचा गर्व करता कामा नये. विशेष म्हणजे या वर्षी प्रत्येक क्षेत्रात दृढ इच्छाशक्तीसह पुढे वाढल्याने यश नक्कीच हाती लागेल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Sankashti Chaturthi Vrat गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक ...

national news
संकष्टी चतुर्थी आणि बुधावर हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज आम्ही ...

मोठा मंगळवार, का खास आहे आजचा दिवस, काय उपाय करावे

national news
आज मंगळवार असून हा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज हनुमानाकडून प्रार्थना करून मागितलेली ...

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

national news
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतसाठी काही उपाय करणे ...

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

national news
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. * प्रदक्षिणा ...

निर्वाण म्हणजे काय?

national news
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...