1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

त्वचा उजळ होण्यासाठी संत्रीच्या सालीचे 5 फायदे

संत्रीचे साल त्वचेवरील डाग कमी करते. त्वचा चमकदार होण्यासाठी संत्रीचे साल फायदेमंद आहे. टॅनिंग कमी करण्यासाठी संत्रीच्या सालाची पावडर लावू शकतात.  
Orange Peel Benefits : आंबट-गोड संत्री सर्वांनाच आवडते. संत्री ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. संत्री हे आपल्या पाचन संस्था पासून त्वचा चांगली ठेवण्या पर्यंत फायदेमंद असते. संत्री मध्ये विटामिन C आणि फायबर भरपूर मात्रामध्ये असते. संत्री खाल्ल्या नंतर आपण ते साल फेकून देतो. पण तुम्हाला महित आहे का की संत्रीचे साल तुमच्या त्वचेसाठी किती उपयोगी आहे. संत्रीच्या सालीत अँटीऑक्सीडेंट, विटामिन C, कैल्शियम, विटामिन B6 आणि फाइबर हे गुण असतात. याचे सेवन खूप छान परिणाम देते तसेच त्वचेसाठी उपयोगी आहे. संत्रीच्या सालीचा उपयोग करण्यासाठी तुम्ही कुठल्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन शॉप मधून Orange Peel Powder घेऊ शकतात. तसेच घरी सुद्धा तुम्ही ही पावडर तयार करू शकतात. चला जाणून घेऊ या संत्रीच्या सालीचे फायदे. 
 
1. चेहऱ्यावरील खड्डे, काळे डाग कमी होतील- संत्रीच्या सालीचा उपयोग करण्यासाठी आधी तिला वाळवून घ्यावे. मग याची पेस्ट बनवून उपयोग करू शकतात. या लेपला  लावल्यांनंतर तुमच्या त्वचेवरील डाग, खड्डे, पिंपल्स कमी होतील. 
 
2. टॅनिंग पासून आराम-  संत्रीच्या सालीची पावडर चांगली आणि पोषणयुक्त स्क्रबचे कार्य करते. यात गुलाबजल टाकून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळ ठेऊन स्क्रब करू शकतात. जर तुमची त्वचा कोरडी असल्यास कच्च्या दुधाचा वापर करावा. असे केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाईल. 
 
3. ग्लोइंग स्किन- चमकदार त्वचा होण्यासाठी संत्रीच्या सालीचा उपयोग करणे. हे त्वचेला नैसर्गिक चमक देईल. यात विटामिन C आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर मात्रा मध्ये असते. जे त्वचेला चमकदार बनवते. 
 
4. त्वचा राहिल हाइड्रे-  तुम्ही असे पण करू शकतात संत्रीचे साल आणि संत्रीचा रस यांना एकत्रित करून पेस्ट बनवू शकतात. यामुळे तुमच्या त्वचेत ओलावा राहिल. 
 
5. डॅमेज स्किन पासून मुक्ति- उन्हामध्ये जर तुमची त्वचा काळवंडली असेल तर संत्रीच्या सालाचे पावडर बनवून ती लावावी यामुळे तुम्हाला फरक जाणवेल. एकदा नक्की करून पहा हा उपाय पुष्कळ फरक दिसेल. तसेच आठवड्यातून हा उपाय एकदा करावा. 

 अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik