बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

‘व्हाईटहेड्‌स’ला बाय-बाय करण्याचे उपाय...

अनेकांना व्हाईटहेड्‌स आणि पिंपल्सच्या समस्येला सामोरे जावे लागते. यावर उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. परंतु, त्याचा योग्य परिणाम होतोच असे नाही. यामुळे आम्ही तुम्हाला असा एक परिणामकारक उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील व्हाईटहेड्‌स नाहीसे होऊन पिंपल्सपासून सुटका मिळेल.
 
चेहऱ्या पिंपल्स येण्यापूर्वी ते व्हाईटहेड्‌स व ब्लॅकहेड्‌सच्या स्वरूपात असतात. त्वचेवरील छिद्रे अतिरिक्त तेल, मृत पेशी व बॅकटेरियामुळे बंद होऊन व्हाईटहेड्‌स तयार होतात. व्हाईटहेड्‌स या प्रामुख्याने कपाळावर, नाकावर, गालांवर येतात. यासाठी पुढील उपाय करा…
 
बेकिंग सोडा
 
बेकिंग सोडा त्वचेवर खोलवर जाऊन छिद्रे मोकळी करतो. यामुळे त्यातील अनावश्‍यक तेल, धुळ आणि मृत पेशी निघून जातात. तसेच यामुळे त्वचेचीpH पातळीदेखील राखली जाते.
 
सर्वप्रथम 1 टीस्पून बेकिंग पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर आवश्‍यक ठिकाणी लावून काही मिनिटांत चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. जर तुम्ही हा प्रयोग दिवसातून 2-3 वेळा काही दिवस केला तर तुम्हाला याचा नक्कीच चांगला परिणाम जाणवेल.