1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

नारळाच्या तेलापासून बनवा नाइट क्रीम, त्वचा चमकदार दिसेल

नारळाच्या तेलापासून बनलेली नाइट क्रीम कोरडया त्वचेसाठी चांगली असते. हे तेल त्वचेतला ओलावा देऊन त्वचा चमकदार बनवते. याच्या नियमित उपयोगामुळे सुरकुत्यांची समस्या देखील कमी होते. 
 
Night Cream at Home :  सुंदर आणि दाग विरहित त्वचा होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे  स्किनकेयर प्रोडक्ट वापरतो. आजच्या काळात प्रदूषण आणि धूळ, माती यांमुळे आपली त्वचा खराब होते. यामुळे दिवसभर बाहेर राहिल्यावर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे गरजेचे असते. पण त्वचा चांगली राहण्यासाठी फक्त चेहरा धुणे गरजेचे नसते तर काळजी घेणे देखील गरजेचे असते. चेहरा धुतल्यानंतर तुम्ही नाइट क्रिमचा उपयोग करू शकतात. 
 
नाइट क्रीम इतर मॉइस्चराइजर पेक्षा वेगळी असते. ही क्रीम रात्री त्वचेला हायड्रेट ठेवायला मदत करते. बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम उपलब्ध असतात. जे आपल्या त्वचेला हायड्रेट करायला मदत करतात. पण चांगली नाइट क्रीम जास्त महाग येते. तसेच तिचे साइड इफेक्ट्स पण होऊ शकतात. म्हणून तुम्ही घरी पण नारळाच्या तेलाने नाइट क्रीम बनवू शकतात. चला जाणून घेऊ या नारळाच्या तेलापासून नाइट क्रीम कशी बनवू शकतो. 
 
नाइट क्रीम बनवण्यासाठी साहित्य-
1 छोटी वाटी नारळाचे तेल
1 विटामिन E ची कैप्सूल 
टी ट्री ऑइलचे काही थेंब 
 
नाइट क्रीम बनवण्याची कृती -
सर्वात आधी एका वाटीत नारळाचे तेल घेऊन त्यात विटामिन E कैप्सूलचे ऑइल टाका . नंतर यात टी ट्री ऑइलचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. आता रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवून घ्या व या क्रीमला लावा. या क्रीमला तुम्ही 1 आठवडया पर्यंत स्टोर करू शकता. 
 
नारळाच्या तेलापासून बनलेल्या नाइट क्रीमचे फायदे- 
या क्रीमला लावल्यामुळे तुमची स्किन हायड्रेड होईल. 
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी ही क्रीम मदत करेल. 
तुमची त्वचा अधिक प्रमाणात कोरडी असेल तर या क्रीमचा उपयोग फायदेशीर आहे. 
पिगमेंटेशन आणि सुरकुत्या या समस्या कमी करते. 
तुम्ही घरीच ही क्रीम बनवू शकतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर क्रीम लावू नका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik