शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

आवश्यक आहे मेकअप ब्रशची सफाई

रोज वापरण्यात येणार्‍या मेकअप ब्रशची स्वच्छता करणेही आवश्यक आहे. यात जमणारे अंश स्किन आणि आय इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतात. जाणून घ्या काही टिप्स:
मेकअप ब्रशमध्ये डस्ट, ऑयल आणि बॅक्टेरिया जमत असतात. म्हणून जितका ब्रशचा वापर असेल त्याप्रमाणे तो स्वच्छही केला गेला पाहिजे.
 
एका बाऊलमध्ये दोन तृतियांश पाणी आणि एक तृतियांश व्हिनेगर टाकून ब्रश भिजवून ठेवा. काही वेळानंतर ब्रश पाण्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
 
आपण क्लींजरने ब्रश स्वच्छ करू शकता. याने ब्रशची घाण बाहेर निघून जाते.