शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (13:42 IST)

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं

शरीराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात काहोईना लक्ष देत असतो. पण नखांच्या स्वच्छतेकडे प्रत्येकाचं लक्ष असतंच असं नाही. त्यामुळे नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. नखांना बुरशीजन्य संसर्गाची लागण कुठेही होऊ शकते. जीम, स्वयंपाकघर, सार्वजनिक शौचालय, ऑफिस अशी अनेक ठिकाणं असतात. या ठिकाणी अनेक लोकांचा वावर असल्याने किटाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. सुरुवातीला या संसर्गाची तीव्रता जास्त नसली तरी नंतर त्रास वाढू शकतो. नखांच्या संसर्गाचा परिणाम नखांच्या आकारावर आणि वाढीवर होऊ शकतो. त्यानंतर हा संसर्ग त्वचेपर्यंत पोहोचण्याचीही शक्यता असते. या संसर्गाला ओळखण्यासाठी नखांचा रंग तपासा. नखांचा रंग कारणाशिवाय पिवळसर होत असेल तर संसर्ग होण्याची शक्यता असते. अनेकदा शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खराब नखांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. नखं सतत डिटर्जंट, उग्र वासाचे पदार्थ, उग्र मसाले यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग व्हायची शक्यता असल्याचं तज्ज्ञ सांगतात. नखांच्या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास सोरायसिस व्हायची शक्यता असते. यामध्ये नखं मुळापासून निघायची शक्यता असते. नखांवर लाल किंवा पिवळे डागपडायची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. नखांना संसर्ग होऊ नये म्हणून पुढील काळजी घ्यावी.
* संपूर्ण बाजूने बंद पादत्राणं वापरायची टाळा.
* नखांच्या प्रसाधनांचा इतरांना वापर करू देऊ नका.
* रात्री झोपण्यापूर्वी नखांना मॉईश्चरायझर लावा.
* स्वच्छ सॉक्स वापरा. जेणेकरून अस्वच्छ कपड्यांचा त्रास होणार नाही.