मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (08:20 IST)

चेहऱ्या वरील डाग कमी करण्यासाठी दही वापरा

Use
सुंदर आणि स्वच्छ चेहरा सर्वाना आकर्षित करतो. चेहऱ्यावरील डाग सुंदर चेहऱ्याचे सौंदर्य देखील नाहीसे करतात. डाग असल्यावर चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी महागडे उत्पादन वापरल्याने त्वचा खराब होते. या साठी आपण दह्यासह या गोष्टींचा वापर करा. चेहऱ्यावरील डाग नाहीसे होईल. दह्यासह आपण मुलतानी माती,बीटरूट,बदाम तेलाचा वापर करून पेस्ट बनवा आणि ती लावा. 
 
* पॅक कसे बनवावे- 
एक चमचा मुलतानी माती मध्ये एक चमचा दही, बीटरूटला किसून घ्या आणि थोडस बदामाचे तेल मिसळा.हे पॅक चांगल्या प्रकारे मिसळा. हे पॅक लावल्याने लहान डाग,गडद मंडळे नाहीसे होतील. हे पॅक चेहऱ्यावर लावा. मुलतानी माती आणि बीटरूट त्वचेमधील मेलॅलिनचा  उत्पादन प्रतिबंधित करते. जेणेकरून त्वचेवर गडद डाग आणि फ्रीकल दूर होतात.
 
* कसे वापरावे -
सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि हा फेसपॅक लावा. कोरडे झाल्यावर पाण्याने धुवून घ्या. नंतर या वर कोरफड जेल लावून पाच मिनिटे चेहऱ्याची मॉलिश करा.नंतर चेहरा स्वच्छ करा. हे पॅक वापरून चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.