मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (19:48 IST)

जाणून घ्या आपले आधार कार्डाचे कुठे कुठे वापरले आहे

भारत सरकार ने सार्वजनिक सेवेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. आधार कार्डाचा वापर, बँक खाते,मोबाईल नंबर, शिष्यवृत्ती, पासपोर्ट इत्यादी साठी  केला जातो. आधार कार्डला लिंक केल्यावर आपण हे विसरतो की आपल्या आधार कार्डाचा वापर कुठे कुठे होत आहे, आणि त्याचा कोणी गैरवापर तर करत नाही, या त्रासापासून वाचण्यासाठी यूआईडीएआई  ने आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याचे पर्याय सुरु केले आहे. आपले आधार कार्ड कुठे वापरले जात आहे हे जाणून घेण्यासाठी यूआईडीएआई ने नवीन सुविधा दिली आहे. याचे नाव आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री ठेवले आहे. जर आपण देखील जाणून घेऊ इच्छिता की आपले आधार कार्डाचे वापर कुठे होत आहे तर या साठी माहिती सांगत आहोत.जाणून घेऊ या.
यूआईडीएआई आधार ऑथेंटिकेशन-
 
यूआईडीएआई आधार ऑथेंटिकेशन या प्रक्रियेत आपल्या आधार नंबर ची संपूर्ण माहिती जतन केलेली असते हे सेंट्रल आइडेंटिफाइड डेटा रिपॉजिट्री (सीआईडीआर) कडे दस्तऐवजद्वारे सबमिट केली जाते.यूआयडीएआय आपल्या माहितीसाठी ऑनलाइन सुविधा प्रदान करते,
 
सुरक्षा
आधार सरकारच्या संरक्षणासाठी भारत सरकारने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, या सुविधेच्या माध्यमातून आधारचा गैरवापर थांबविला गेला आहे, या माध्यमातून भारत सरकारच्या निधीचा योग्य वापर केला जात आहे आणि त्यामुळे फक्त गरजूंना त्याचा लाभ मिळत आहे. 
 
आधार ऑथेंटिकेशन सुविधा कशी वापरायची -
 
1 या साठी आपल्याला यूआईडीएआई च्या https://resident.uidai.gov.in संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल. 
 
2 आता आपल्यापुढे एक पेज येईल त्यात आधार सर्व्हिसेस लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा. 
 
3 या नंतर एक नवीन पेज उघडेल ज्याचा वर Aadhaar Authentication History हे पर्याय दिले असेल त्यावर क्लिक करा.
 
4 एक नवीन पेज दिसेल या वर आपल्याला Enter UID/VID (आधार कार्ड नंबर किंवा आधार वर्चूव्हल आई डी Enter Security Code (कैप्चा कोडहे लिहिलेले दिसेल) त्यामध्ये माहिती प्रविष्ट करायची आहे.
 
5 एक नवीन पेज उघडेल या मध्ये अथेंटिकेशन टाईप निवडा सिलेक्ट डेट रेंज (या मध्ये दोन तारखा असतील या दरम्यान माहिती दिली जाईल)नंबर ऑफ रेकॉर्डस् ओटीपी हे आपल्या अधिकृत नोंदणीकृत मोबाईल नंबर वर येईल.
 
6 एंटर की दाबायाची आहे.
 
7 आता आपल्यासमोर तारीख आणि वेळेनुसार संपूर्ण माहिती दिसेल, या मध्ये आपल्याला आधार ला व्हेरिफाय करण्यासाठी ऍथॉरिटी कडे किती वेळा सत्यापित करण्यासाठी विनंती केली आहे हे समजेल.जर आपल्याला असे वाटत आहे की आपल्या आधार कार्डाचा कोणी गैरवापर करत आहे तर या साठी आपण ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकता.