रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (18:44 IST)

होळी स्पेशल खाद्य पदार्थ गुझिया

होळीला अनेक प्रकारच्या मिठाई बनविल्या जातात. उत्तरभारतात, राजस्थान मध्ये होळीसाठी एक खास खाद्य पदार्थ घर-घरात बनविला जातो आणि तो आहे गुझिया, ज्याला आपण करंजी म्हणून ओळखतो. या खाद्य पदार्था शिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो. चला तर मग गुझिया बनविण्याचे साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
  
साहित्य- 
एक कप मैदा,साजूक तूप,मीठ,पिठी साखर, 1 कप मावा, काजूपूड, बदामपूड, वेलची पावडर,दालचिनी पूड,खसखस, तेल.
 
कृती- 
सर्वप्रथम एका कढईत दोन चमचे तूप घालून मावा परतून घ्या. त्यामध्ये  पिठीसाखर, वेलचीपूड,काजूपूड,बदामपूड खसखस घालून परतून घ्या. आणि सारण थंड होऊ द्या. कणिक मळण्यासाठी एका पात्रात मैदा घेऊन त्यात चिमूटभर मीठआणि तुपाचे मोयन घालून लागत लागत पाणी घालून कणिक मळून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा. नंतर कणकेच्या पुऱ्या लाटून त्यामध्ये सारण भरून कड्या पाणी लावून बंद करून त्याला अर्धचंद्राचा आकार द्या. आणि अशा प्रकारे सर्व गुझिया तयार करून घ्या. आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि त्यात सर्व तयार गुझिया तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या. आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.