बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (18:49 IST)

सर्वांगासनाचे फायदे जाणून घ्या थॉयराइडच्या रुग्णांसाठी वरदान आहे

सर्वांगासन याचा नावानेच स्पष्ट आहे की हे आसन सर्व अवयवांसाठी आहे. ज्यांना व्यायाम किंवा योग करणे जमत नसेल किंवा आपल्याकडे वेळेचा अभाव असेल तर अशा लोकांनी किमान एकदा तरी सर्वांगासनाचा सराव करावा. याचे अनेक लाभ आहे. स्त्रियांसाठी तर जणू हे वरदानच आहे. त्यांच्या अनेक समस्यांचे समाधान या आसनामुळे होतात. सुरुवातीला आपण भिंतींचा आधार घेऊन देखील हे करू शकता. दररोज या आसनाचा सराव केल्याने हे करणे सहज होईल.
 
सर्वांगासन कसे करावे-
सर्वप्रथम पाठीवर झोपावे. नंतर आपले पाय ,कुल्हे,कंबर उचला,सर्व भार खांद्यावर घ्या. पाठीला हाताचा आधार द्या,जेणे करून संतुलन बनलेले राहील. 
कोपरे जमिनीला टेकवून हाताला कंबरेवर ठेवून, पाय आणि कंबर सरळ ठेवा.शरीराचे संपूर्ण भार खांद्यावर आणि हाताच्या वरच्या भागावर असावे. पाय ताठ आणि सरळ असावे. पायाची बोटे नाकाच्या सरळ दिशेला न्यावे. दीर्घ श्वास घ्या आणि 30 सेकंद या अवस्थेमध्ये राहा.  
 
सर्वांगसनाचे लाभ-
* थॉयराइड ग्रंथी सक्रिय करतो,आणि त्यांना पोषण देतो.
* हृदयाचे स्नायू सक्रिय करतो आणि शुद्ध रक्त हृदयापर्यंत पोहोचवतो.
* वंध्यत्व आणि गर्भपात या सारख्या समस्यांना दूर करतो. 
* मासिक पाळीच्या त्रासाला कमी करतो. 
* बद्धकोष्ठतेपासून आराम देतो,पचन क्रिया सक्रिय करतो. 
* थकवा आणि अशक्तपणादूर करण्यासाठी फायदेशीर आहे. 
* हात आणि खांदे बळकट करतो. पाठीला लवचिक बनवतो. 
* रक्त पुरवठा सुरळीत करून मेंदूचे पोषण करतो.
* लठ्ठपणा कमी करतो.