बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (08:10 IST)

साजूक तूपाचे फायदे जाणून घ्या

बऱ्याच वेळा लोकांना असे वाटते की साजूक तूप आपल्या आहारात घेतले तर त्यांचे वजन वाढेल. आयुर्वेद मध्ये सांगितले आहेत की जर आपल्या आहारात साजूक तूप वापराल तर लठ्ठपणा,आणि बद्धकोष्ठता सारखे त्रास होत नाही. म्हणून आहारात साजूक तूप समाविष्ट करण्याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
1 लठ्ठपणा कमी करतो- या मध्ये सीएलए आहे जे मेटाबॉलिज्म किंवा चयापचय चांगले ठेवतो. या मुळे वजन नियंत्रित करण्यात मदत मिळते. गायीच्या तुपात कोलेस्ट्रॉल नसत.  हे तूप शरीरात साचलेल्या हट्टी फॅट वितळून मेटाबॉलिज्म वाढविण्यात मदत करतो. 
 
2 बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देतो-तुपाच्या सेवन केल्याने बद्धकोष्ठते सारख्या त्रासापासून आराम मिळतो. आयुर्वेदानुसार साजूक तूप पित्त नाहीसे करतो. तसेच शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. 
 
3 हार्मोन नियंत्रित करतो- साजूक तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के 2 ,व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई च्या व्यतिरिक्त अनेक पोषक घटक आढळतात.साजूक तुपाचा सेवन गरोदर स्त्रियांसाठी आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी फायदेशीर आहे.
 
4 हाडांना बळकट करतो - साजूक तुपात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन के 2 आढळते, जे हाडांसाठी आवश्यक द्रव्य पदार्थ बनविण्यात मदत करतो. साजूक तूप खाल्ल्याने हाड देखील बळकट होतात. 
 
5 त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे-  तुपाने चेहऱ्याची मॉलिश केल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. चेहऱ्यावरील तेज आणि ओलावा पुन्हा येतो. या शिवाय डोक्यावर देखील तुपाची मॉलिश करणे फायदेशीर आहे. डोक्यावर केसांची मॉलिश केल्याने केस घनदाट आणि चमकदार बनतात.