शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

असे वाढवा सौंदर्य

ND
प्रत्येक मोसम त्वचेसाठी नवीन आव्हान घेऊन येतो. म्हणूनच त्वचेची देखभाल जरूरी आहे. पण अनेकदा मोसमानुसार त्वचेसाठी काय करायला हवे हे
कळत नाही. नीट लक्ष दिल्यास वर्षभर त्वचा चमकदार राहू शकते.

त्यासाठी गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :

काकडी, टोमॅटो आणि गाजराचा रस सम मात्रेत घेऊन 15-20 दिवस चेहर्‍यावर लावल्याने चेहरा उजळण्यात मदत होते.

पुदिन्याचा रस नियमित चेहर्‍यावर लावल्याने चेहर्‍यावरील काळे डाग निघून जातात.

कच्च्या बटाट्याचा रस त्वचेवर लावल्याने सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

केळ्यांना स्मॅश करून त्यात थोडंसं मध आणि एक दोन थेंब ग्लिसरीन घालून चेहर्‍याचा मसाज केला पाहिजे. त्याने चेहरा ताजेतवाना दिसतो.