शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 4 जून 2016 (15:53 IST)

आंबा आरोग्यासोबत सुंदरतेत देखील फायदेशीर!

काय तुम्हीपण आंब्याच चाहते आहात ? बहुतेकच असा कोणी व्यक्ती असेल ज्याला आंब्याची चव आवडत नसेल पण काय तुम्ही याच्या ब्युटी बेनेफिट्सबद्दल ऐकले आहे का? आंबा आरोग्यासाठी जेवढा फायदेशीर आहे तेवढाच सुंदरतेसाठी देखील.  
 
सुंदरेत निखर आणण्यासाठी देखील करू शकता आंब्याचा वापर :
 
1. उत्तम स्‍क्रब आहे आंबा   
एका लहान वाटीत आंब्याचा पल्प घ्या. त्याच एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मध मिसळा. या तिघांना एकत्र घेऊन चांगल्या प्रकारे फेटून घ्या. या पेस्टला हाताने चेहर्‍यावर फेसपेक प्रमाणे लावा. यामुळे डेड स्क‍िन आणि ब्लैकहेड्स साफ होतील व  चेहर्‍यावर नॅचरल ग्लोपण येईल.  
 
2. फेस पॅकप्रमाणे देखील करू शकता याचा वापर   
तुम्ही आंब्याच्या सालांनी फेसपॅक तयार करू शकता. याला उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये दही किंवा गुलाब पाणी मिसळून रोज लावायला पाहिजे. हे पॅक डार्क स्पॉट आणि पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 
3. पिंपल्सपासून सुटकारा   
जर तुमच्या चेहर्‍यावर फार जास्त प्रमाणात पिंपल झाले असतील तर कच्च्या कैरीला बारीक कापून त्याला पाण्यात उकळून घ्या. या पाण्याने दिवसातून दोनवेळा चेहरा धुतल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत मिळेल.  
 
4. टॅनिंग दूर करण्यासाठी   
कच्चे किंवा पक्क्या आंब्याच्या सालांना आपल्या हाताला किंवा पायाला चोळा. यात उपस्थित असलेले व्हिटॅमिन सी टॅनिंगला दूर करण्याचे काम करतो. साल चोळल्यानंतर दही किंवा सयीने मसाज केले पाहिजे. नंतर हात पाय स्वच्छ धुऊन टाका.