शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (14:29 IST)

ब्युटी टिप्स

दिवसा वेगळा लुक देण्यासाठी ओठांवर नॅचरल शेडच्या लिप ग्लॉसचा वापर करावा. लिप पेंसिलद्वारे आऊट लाइन बनवून त्यात लिप ग्लॉस लावा.  

चंदन व जैतूनचे तेल एकत्र करून डोळ्या खाली लावल्याने डार्क सर्कल कमी होतात.

हातांना मसाज करताना नखांना देखील हळूवारपणे मसाज करावा. ही ट्रीटमेंट करण्यापूर्वी नखांना लावलेले नेलपेन्ट काढून घेणे आवश्यक असते.

कारल्याची साल चेहर्‍यावर चोळा. यामुळे पिंपल, ब्लॅकहेड निघण्यासाठी मदत होईल. हा उपाय साधारण तीन ते पाच दिवस करून पाहा. फरक जाणवेल.

चंदनाची पूड व दूध एकास तीन या प्रमाणात एकत्र करून तोंड आणि हातावर चोळा. १५ मिनिटांनी धुऊन टाका. हा उपाय साधारण दर दोन दिवसांनी करा.

केशराच्या तीन- चार काड्या दुधाच्या सायीमध्ये मिसळून रोज रात्री ओठावर लावून झोपावे. असे केल्याने काही दिवसातच ओठ सतेज व मुलायम होतात.

नेलपॉलिश रिमूव्हरचा वापर करून नेलपॉलिश पूर्णपणे काढल्यानंतर शॅम्पूमिश्रीत पाणी आणि टूथब्रशच्या साहाय्याने नखे हळूवारपणे घासून घ्यावीत.

तुम्हाला घामाचा दुर्गंधीमुळे लोकांसमोर जाण्यास लाज वाटत असेल तर या समस्येपाला दूर करण्यासाठी शरीरातील त्या भागात बेबी पावडर लावायला पाहिजे.

फँटेसी मेकअपबरोबर तशाच स्टाइलची मेंदी लोकप्रिय झाली आहे. यात ड्रेस व ज्वेलरीच्या रंगांशी मेळ खात असलेल्या रंगांनी मेंदीची डिझाइन केली जाते.

अंघोळीच्या पाण्यात 2 चमचे ग्लिसरीन घालून स्नान केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. संत्रीच्या सालांची पूड, सायीचे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.