शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

सौंदर्यप्रसाधनांनी वाढतो मधुमेहाचा धोका

WD
सौंदर्यप्रसाधनांचा वापर केल्याशिवाय अलीकडे महिला तर सोडा, पण पुरुषांचेही पान हालत नाही. सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर करण्यांसाठी मात्र आता एक वाईट बातमी आहे. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या काही खास प्रकारच्या रासायनिक घटकांमुळे मधुमेह होण्याचा दोका अनके पाटींनी वाढतो, असे एका नव्या संशोधनातील निष्कर्षातून समोर आले आहे ज्या महिला सौंदर्यप्रसाधनांचा अधिक वापर करतात, त्यांना मधुमेह होण्याची जास्त भीती असते.

या शोधानुसार, नेल पॉलिश, हेअर स्प्रे, साबण आणि शाम्पूसारख्या अनेक उत्पादनांमध्ये पॅथलेट्‍स नामक एक रसायन आढळते. हेच रसायन मधुमेहासाठी कारणीभूत ठरते. पॅथलेट्‍स आणि इंसूलिन प्रतिरोधकादरम्यान एक संबंध असल्याचे शोधातून आढळून आले आहे. पॅथलेट्‍स शरीराच्या इं‍सूलिन प्रतिरोधक क्षमतेला प्रभावित करतो. पॅथलेट्‍स शरीरातील शर्करेचे पचन करण्याचे कार्य बाधित करतो. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रीव्हेंशन द्वारा आयोजित नॅशनल हेल्थ अॅन्ड न्यूट्रिशियन नामक शोधाअंतर्गत वर्ष 2001 ते वर्ष 2008 दरम्यान दोन हजारांपेक्षाही अधिक महिलांकडून प्राप्त माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या ‍महिला 20 ते 80 वयोगटांतील होत्या व त्यांच्या मुत्राचे नमुने घेण्यात आले होते. शोधकर्त्यांनी सांगितले की, ज्या नमुन्यांमध्ये मोनो बेन्झायल पॅथलेट्स व मोनो आयासोबायटल पॅथलेट्‍स हे दोन्ही रसायन आढळून आले, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता दुप्पट होती, तर ज्या महिल्यांमध्ये मोनो बायटल पॅथलेट्‍स व डाय-2 एथिलहायक्झाईल पॅथलेट्सचे प्रमाण आढळून आले, त्यांना मधुमेह होण्याचा धोका 70 टक्क्यांनी वाढला होता. ज्या महिला सौंदर्यप्रसाधनांचा वापर कमी करीत होत्या, त्यांच्या शरीरात हे रसायन एवढ्या प्रमाणात आढळून आले नाही. पॅतलेट्सची पातळी वाढविण्यासाठी स्थूलता हे देखील एक महत्वाचे कारण असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.