शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (07:35 IST)

बीएसएनएलचा ‘वर्क फ्रॉम होम’ साठी नवीन प्लॅन

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. बीएसएनएलने प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन 599 रुपयांचं वर्क फ्रॉम होम स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) आणलं असून यामध्ये युजर्सना दररोज 5 जीबी डेटा वापरण्यास मिळेल. कंपनीने 90 दिवसांच्या वैधतेसह हा नवीन 599 रुपयांचा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन आणला आहे. यामध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसचा फायदा मिळतो. देशभरातील कोणत्याही नेटर्कवर कॉलिंगसाठी दररोज 250 मिनिटे मिळतात.
 
याशिवाय, दररोज 5 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजे 90 दिवसांसाठी एकूण 450 जीबी डेटा ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळतो. तर, दिवसाचं डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80 Kbps इतका मिळेल. गेल्या वर्षीही बीएसएनएलने 599 रुपयांचा प्रीपेडस प्लॅन आणला होता. अनलिमिटेड कॉलिंगसह त्या प्लॅनची वैधता तब्बल 180 दिवस होती.