ATMच्या नियमात बदल, रात्री 9 नंतर पैसे भरता येणार नाही
सरकारने ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे भरता येणार नाहीत. कॅशव्हॅनमधून एकाच वेळी 5 कोटींहून अधिक रक्कम घेऊन जाता येणार नाही. त्याप्रमाणेच कॅशव्हॅनची सुरक्षा करणा-या कर्मचा-यांना चोरांपासून बचाव करण्याचं संरक्षणही दिलं जाणार आहे. ग्रामीण भागासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पैशांची वाहतूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना त्यांच्या आधारची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ATMमध्ये कॅश भरण्यात येणार नाही.
सर्व कॅशव्हॅनमध्ये GSMवर आधारित ऑटो डायलर, सिक्युरिटी अलार्म आणि मोटराइज्ड सायरन बसवण्यात येणार आहेत. कॅशव्हॅनमध्ये सीसीटीव्ही, लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि बंदुकांसह सिक्युरिटी गार्ड तैनात राहणार आहेत. सिक्युरिटी गार्डच्या बंदुकीतून दोन वर्षांतून कमीत कमी एकदा टेस्ट फायरिंग केली जाणार आहे. तसेच बुलेट प्रत्येक दोन वर्षांनी बदलण्यात येणार आहे. CCTVच्या माध्यमातून चोरांवर नजर ठेवली जाणार आहे.