बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

येणार्‍या तीन-चार वर्षात डेबिट व क्रेडिट कार्ड इतिहासजमा होतील

वाढत्या मोबाईल वापरामुळे येत्या तीन-चार वर्षात एटीएम तथा डेबिट आणि क्रेडिट कार्ड लवकरच इतिहासजमा होतील. ग्राहकांचे व्यवहार हे मोबाईल फोनवरच होतील, असे भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले आहे. त्यांना नोएडा कॅम्पसमध्ये अॅमिटी युनिव्हर्सिटीत मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
 
भारताची ७२ टक्के लोकसंख्या ही ३२ वर्ष वयोगटातील आहे. ही संख्या अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत जास्त असल्याने भारताला फायदेशीर ठरणारी आहे असे म्हणून कांत पुढे म्हणाले, एटीएम तथा डेबिट आणि क्रेडिट कार्ड हे झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे मागे पडून पुढील ३-४ वर्षातच भारतातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मोबाईलवरच होतील, असे भाकीत कांत यांनी वर्तविले. तसेच मोबाईलद्वारे ट्रँझॅक्शन्स करण्याचा ट्रेण्ड आतापासूनच वाढू लागला असल्याचेही कांत यांनी सांगितले.