testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सोन्याच्या दरात मोठी घसरण

Last Modified शनिवार, 9 डिसेंबर 2017 (09:06 IST)

सोन्याच्या दरात होणारी मागणी कमी झाल्याने आणि जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने दरात घट झाली आहे.सोन्याच्या दरात २०० रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २९,७५० रुपयांवर पोहोचला आहे. तर, त्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ४२५ रुपयांनी घट झाल्याने ३७,७०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

सोन्याच्या दरात झालेली घट ही या आठवड्यात २.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. ही घटीने ५ मे पासूनचा निच्चांक गाठला असल्याचं म्हटलं जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं १.२७ टक्क्यांनी घट झाल्याने तो १२४७.८० डॉलर प्रति औन्स झाला आहे. तर, चांदीमध्येही १.४१ टक्क्यांनी घट झाल्याने १५.७० डॉलर प्रति औन्स झाला आहे. यासोबतच स्थानिक बाजार आणि ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्याचं दिसत आहे.यावर अधिक वाचा :