सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (09:58 IST)

ग्राहकांना मोठा दिलासा! सोने प्रतितोळा 500 रुपयांने घसरले, आताचे दर पहा

सोने-चांदीने मोठा दिलासा दिला. सोने दरात नवीन वर्षात 2 जानेवारीचा अपवाद वगळता सातत्याने घसरण सुरू आहे. सोमवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने दरात प्रति तोळ्यामागे 500 रुपये घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर 63 हजाराच्या खाली आला आहे. मात्र दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला. 
 
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने विनाजीएसटी 64 हजारांवर पोहचले होते. चांदीनेही ७७ हजाराचा पल्ला गाठला होता. ऐन लग्नसराईत झालेल्या दरवाढीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. मात्र मागील काही दिवसात दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण दिसून येतेय.
 
नवीन वर्षात 1 तारखेला 63800 रुपये तोळा असणारे सोने 2 जानेवारी रोजी 300 रुपयांनी वाढून 64150 वर पोहोचले. दुसऱ्या दिवशी त्यात 450 रुपये घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी दर 400 रुपयांनी घसरले. त्यानंतर दोनशे व शंभर रुपयांची घसरण होत आठवड्याच्या शेवटी 63200 रुपये प्रति तोळ्यावर आलेले सोने सोमवारी 500 रुपयांनी घसरून 62700 रुपयांपर्यंत खाली आले. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून येत आहे. उच्चांकापासून चांदी तब्बल 4000 ते4500 हजार रुपयांनी घसरली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor