बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (07:14 IST)

Hero MotoCorp ने चार टू-व्हीलर्स बंद केल्या

Hero MotoCorp ने आपल्या चार टू-व्हीलर्स बंद केल्या आहेत. यामध्ये Glamour, Passion XPro बाइक आणि Maestro 110, Duet 110 स्कूटर्सचा समावेश आहे. या गाड्या वेबसाइटवरुनही हटवण्यात आल्या असून या चार दुचाकी बीएस-6 अपडेटमध्ये लाँच न करण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. या चार दुचाकींशिवाय कंपनीने XTreme 200T, Xtreme 200R आणि Xtreme 200S या गाड्याही वेबसाइटवरुन हटवल्या आहेत. 
 
कंपनीने यापूर्वीच Glamour FI, Passion Pro i3S आणि Splendor Pro i3S या गाड्या बीएस-6 मध्ये अपडेट केल्या आहेत. आता या गाड्या Glamour BS6, Passion Pro BS6 आणि Splendor Pro BS6 नावाने सादर केल्या जातील. तर, hero maestro 110 आणि hero duet 110 या दोन स्कूटर्सना कंपनीच्या गेल्या वर्षी लाँच झालेल्या नवीन maestro 125 ने रिप्लेस केले आहे.
 
याशिवाय कंपनीने आपली पहिली 160सीसी बाइक Hero Xtreme 160R पुन्हा आणली आहे. ही बाइक कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. Xtreme 160R एप्रिल महिन्यात लाँच होणार होती, पण करोना व्हायरसमुळे या बाइकची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली आहे.