Widgets Magazine
Widgets Magazine

रिलायन्स जिओमुळे आयडियाला फटका

रिलायन्स जिओमुळे आयडियाला फटका बसला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये आयडिया कंपनीला तब्बल 385 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आयडियाला 91.5 कोटींचा नफा झाला होता. मात्र, पुढील तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये 385 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
Widgets Magazine

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी मोबाईल व्हॉईस कॉल रेट्समध्ये 10.6 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. शिवाय, इंटरनेट डेटाच्या किंमतींमध्ये 15 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत आयडिया सेल्युलरच्या ग्राहकांची संख्या 5.41 कोटींहून 4.6 कोटींवर घसरली.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :