पूर्वीच्या सरकारांनी इंधन निर्भरतेकडे लक्ष दिलं असतं, तर आज ही वेळ आली नसती - पंतप्रधान मोदी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलच्या दरांनी सध्या शंभरचा टप्पा गाठला आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेकडे लक्ष दिलं असतं, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं.
तामीळनाडूतील एन्नौर-थिरूवल्लूर-बंगळुरू-पुदूच्चेरी-नागापट्टणम-मदुरै-तुतीकोरिन या नॅच्युरल गॅस पाईपलाईनच्या रामनाथपूरम-थुथूकडी खंडाच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते.
आपण आयातीवर एवढं अवलंबून असायला हवं का? कुणावरही टीका करण्याची माझी इच्छा नाही. पण या विषयाकडे आपण आधीच लक्ष दिलं असतं तर आपल्या मध्यम वर्गाला हे ओझं सहन करण्याची वेळ आली नसती, असं मोदी म्हणाले.