testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अनिल अंबानी यांच्या आरकॉममधील कर्मचाऱ्यांची संख्या घटली जवळपास ९४ टक्के

Last Updated: गुरूवार, 14 जून 2018 (16:31 IST)
उद्योग विश्वात मोठे नाव असलेले अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉममधील कर्मचाऱ्यांची संख्या जबरदस्त घटली असून, तब्बल ९४ टक्के इतकी झाली आहे. मुकेश अंबानी यांचे जिओ लाँच केल्यापासून कंपनी बाजारात जोरदार चर्चेत असताना आत कंपनीत केवळ ३४०० कर्मचारी राहीले. या कंपनीची कर्मचाऱ्यांची संख्या ५२ हजार होती, ती एकदम घसरली आहे. याबाबत अधिकृत माहिती कंपनीने याबाबतची माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. आता याचा कंपनीच्या उत्पादनांवर आणि सेवांवर मोठा परिणाम दिसून येणार हे नक्की, मात्र अचानक हे कसे झाले असा आपल्याला प्रश्न पडला असेल ना ? अनिल अंबानी यांची कंपनी कर्जबाजारी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले आहे. आरकॉमवर सध्या ४५ हजार करोड रुपयांचे कर्ज आहे. कंपनी २००८ ते २०१० या काळात जोरात असलेली त्यानंतर काही कारणांमुळे अनेक आर्थिक चढउतार आल्याने कंपनीला कर्मचारी कपात केली आहे. जानेवारीमध्ये आपली मोबाईल सेवा बंद केली असून बिझनेस टू बिझनेस स्तरावर दूरसंचार सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. मागच्या काही काळापासून कंपनी बाजारातील आयडीया, व्होडाफोन, एअरटेल यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करत आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

तृप्ती देसाई यांना टॅक्सी मिळेना

national news
शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी कोचीत दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ...

प्रसुती रजेत मिळणारा 7 आठवड्यांचा पगार

national news
महिला कर्मचाऱ्यांना लक्षात घेता सरकार आता महिलांना मिळणाऱ्या प्रसुती रजेबाबत मोठी घोषणा ...

लिव्ह इन रिलेशनशिपसाठीचा महत्वपूर्ण निर्णय

national news
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यांतर्गत पोटगीसाठी ...

इंदिरा गांधी आणि आणीबाणी

national news
इंदिरा गांधी त्यांच्या प्रतिभा आणि राजकीय दृढनिश्चय म्हणून 'जागतिक राजकारण'च्या इतिहासात ...

देशी मद्याची दुकाने सकाळी आठ वाजताच उघडा

national news
राज्यातील देशी मद्याची दुकाने सकाळी आठ वाजताच उघडण्याचा फतवा मुख्यमंत्र्यांच्या गृह ...