सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 2 जुलै 2018 (16:19 IST)

jio परत बनला डाउनलोड स्पीडच्या बाबतीत नंबर वन

jio एप्रिलमध्ये सर्वात फास्ट डाउनलोड स्पीड देणारी कंपनी बनली आहे. तसेच दुसरीकडे डाउनलोड स्पीडच्या बाबतीत आयडियाचे अपलोड सर्वात कमी नोंदण्यात आली आहे. टेलिकॉम रेगूलेट ट्राईचे   पोर्टल माईस्पीडनुसार, एप्रिलमध्ये जियोची डाउनलोड स्पीड 19 MBPS नोंदण्यात आली आहे. तसेच जियोचे प्रतिस्पर्धी एयरटेलची डाउनलोड स्पीड 9.3 MBPS एवढी होती. त्याशिवाय इतर टेली कॉम कंपन्या वोडाफोनची 6.8, आयडियाची 6.5 MBPS नोंदण्यात आली आहे. या दरम्यान आयडियाची  अपलोड स्पीड सर्वात जास्त 6.3 MBPS होती. तसेच वोडाफोनची अपलोड स्पीड 5.2  MBPS, जियोची 4.8 MBPS आणि एयरटेलची 3.8 MBPS होती.  
 
सब्सक्राइबर्सच्या बाबतीत देखील जियोला फायदा
ट्राई टेलिकॉम सब्सक्रिप्शनने एप्रिलच्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की टेलिफोन सब्सक्राइबर्समध्ये 4.85 टक्के कमतरता आली आहे. नंबरमध्ये कमतरता झाल्यानंतर देखील रिलांयस जियोने आपले सबस्क्राइबर्सची संख्या कायम ठेवली आहे. एप्रिलच्या महिन्यात रिलायंस जियोने आपल्यासोबत एकूण 96 लाख सब्सक्राइबर्स जोडले. तसेच मार्चच्या महिन्यात आकडा एकूण 94 लाख एवढा होता.