शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता बिनधास्त डेअरी मिल्क चॉकलेट घ्या

'मॉन्डेलेझ इंटरनॅशनल' या कंपनीतर्फे कमी साखर असणारं 'डेअरी मिल्क चॉकलेट' सादर करण्यात आलं आहे. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार  इतर  चॉकलेटच्या  तुलनेत नव्या उत्पादनात साखरेचं प्रमाण जवळपास ३० टक्के कमी असणार आहे. मुख्य म्हणजे यात गोडवा आणण्यासाठी कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर केला गेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 
 
इतर सर्वच प्रकारच्या चॉकलेट्सप्रमाणे ही नवी, कमी साखर असणारी डेअरी मिल्कही बाजारत गदी सहजपणे उपलब्ध असणार आहे. 'मॉन्डेलेझ इंडिया'चे अध्यक्ष दीपक अय्यर यांनीही हे नवं उत्पादन भारतीय बाजारपेठेत येत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.