testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जनतेच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही : मोदी

नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (11:34 IST)
जनतेच्या पैशाची लूट सहन केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

पंजाब नॅशनल बँकेतील 11,400 कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांनी
या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणार्‍यांना सरकार माफ

करणार नाही. सरकार आर्थिक विषयांशी संबंधित अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. ग्लोबल बिजनेस समिटमध्ये
ते बोलत होते. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्द्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.
त्याचबरोबर पंतप्रधानांनी नाव न घेता रिझर्व्ह बँकेलाही गर्भीत संदेश दिला. मोदी म्हणाले, विविध आर्थिक संस्था आणि संघटनांमध्ये नियम आणि नैतिकता तपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील निरीक्षणसंस्था आणि लेखापालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

ह्युंडईची भन्नाट ऑफर, नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका

national news
ह्युंडईने नव्या कारसाठी नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर कंपनीने आणली आहे.

देशात बालमृत्यूची संख्या कमी झाली

national news
भारतामध्ये 2017 साली 8,02,000 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षातील बालमृत्यूची ...

सर्वाधिक उत्पन्न असणारे आमदार यादीत महाराष्ट्र दुसरा

national news
देशात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यात एकूण ३१४५ आमदारांमध्ये ...

इम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले

national news
पाकिस्तानध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या ...

मराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी

national news
मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य ...