गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

विमानतळाचे नियम रेल्वेला होणार लागू, तिकीट नाही ना मग प्रवेश नाही

देशातील  प्रमुख रेल्वे स्टेशनवर तेथे  प्रवेशासाठी तिकिट घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाणार असाल तर तुम्हाला तिकिट घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणारच नाही. जसे विमान तळावर प्रवेश करण्यासाठी तिकिट आवश्यक आहे त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवेशासाठी तिकिट अनिवार्य असणार आहे. 
 
सोबतच रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या भिंतीची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. जेणेकरुन अनाधिकृत पद्धतीने कोणी आत प्रवेश करणार नाही. यात प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेने लक्ष देण्याचा निर्णय घेतला असे स्पष्ट केले आहे.रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वेतील प्रवाशी, स्टेशनवर असलेले प्रवासी यांची सुरक्षा मुख्य लक्ष आहे. याकरीता आरपीएफ कंमाडोंना विेशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. 
 
कमांडो रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वारावर सुरक्षा देणार आहेत. देशातील गुजरातच्या गांधीनगर, भोपाळच्या हबीबगंज येथील रेल्वे स्टेशनवर प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. सोबतच  दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई येथील रेल्वे स्टेशनवर देखील याला सुरुवात होणार आहे. सरकारकडून 114 कोटींची तरतूद हे साध्य करण्यासाठी सरकारने 114 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 
या अंतर्गत एक असे मशीन लावण्यात येईल की त्यानुसार तिकिट असलेले कर्मचारीच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश करु शकतील. तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूना 3 हजार किलोमीटरची उंच भिंत उभारण्यात येईल. जेणेकरून कोणतीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकणार नाही.आरपीएफचे महानिर्देशक अरुण कुमार यांनी प्रवाशांची सुरक्षा आमचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले आहे.