Widgets Magazine

पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दर सुमारे 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान पेट्रोलच्या दरात सुमारे 7.43 रुपयांची वाढ झाली. प्रत्येक शहरांनुसार ही वाढ कमी-जास्त होती.
जागतिक स्तरावर रिफायनरींच्या क्षमतेत 13 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यात पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय दरात 18 टक्क्यांची, तर डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दरात 20 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेले पाहायला मिळाले.


यावर अधिक वाचा :