शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

’पेमेंट्स वॉलेटच्या केवायसी’ ला मुदतवाढ नाही

पेमेंट्स वॉलेटच्या ग्राहकांची ओळख पटविणारी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत वाढविण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने असमर्थता दर्शविली आहे. यामुळे पेमेंट्स वॉलेटना ‘केवायसी’ची पूर्तता करण्यासाठी केवळ बुधवारचा  शेवटचा दिवसच राहिला आहे. यानुसार पेमेंट वॉलेट कंपन्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही मुदत वाढविली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत मंगळवारी खुलासा करताना आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
 
रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्पष्टीकरणामुळे आता भारतातील १२,००० कोटी रुपयांच्या पेमेंट्स वॉलेट व्यवसायात अनिश्चितता निर्माण झाली आहे. पेटीएम, मोबिक्वीक, ओला मनी, अ‍ॅमेझॉन पे, सोडेक्सोसारखे पेमेंट वॉलेट सध्या लोकप्रिय आहेत.