1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

रिलायन्स बिग टीव्हीची सेवा एक वर्ष मोफत

Reliance Big TV
रिलायन्स बिग टीव्हीने भारतातील एचडी गुणवत्तेच्या मनोरंजन चॅनल्सची व्याप्ती वाढविण्यासाठी नवी ऑफर आणली आहे. यानुसार एक वर्ष ही सेवा मोफत देण्यात येणार आहे. कंपनीने एचईवीसी सेट टॉप सोबत डिजीटर एंटरटेंन्मेंट मोफत देण्याचा निर्णय घेतलाय.रिलायन्स बिग टीव्ही एक नवी सुरूवात करण्याच्या तयारीत आहे. भारतीयांचा टीव्हीमधून मनोरंजन करुन घेण्याची मार्ग बदललाय असे रिलायन्स बिग टीव्हीचे निदेशक विजेंद्र सिंह यांनी सांगितले. 
 
मनोरंजन रिलायन्स बिग टीव्ही ऑफरमधून मोफत सेवा देणार आहे. एचईवीसी सेट टॉप बॉक्ससोबत देशातील घरांमध्ये हाय क्वालिटी घर मनोरंजन आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा मोफत मिळणार आहे. या नव्या ऑफरनुसार पेड चॅनल्स एक वर्षासाठी मोफत देण्यात येत आहेत. ५०० पर्यंत फ्री टू एयर चॅनल ५ वर्षांसाठी मोफत मिळणार आहेत.