testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सुला फेस्टच्या ११व्या वर्षासाठी काऊंट डाऊन!

sula fest
नाशिक- संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून सुला फेस्टच्या अकराव्या हंगामाची प्रतिक्षा आता संपली आहे. जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव असलेल्या च्या तारखा आयोजक सुला विनियार्डस्‌तर्फे जाहिर केल्या आहेत. 3 व 4 फेब्रुवारीला संगीतप्रेमींना नावाजलेल्या संगीतकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी खुली होणार आहे. यंदाच्या सुला फेस्टसाठी बुक माय शो च्या माध्यमातून तिकीट विक्री सुरू झाली आहे.
भव्य दिव्य अशा सुला फेस्टच्या गेल्या दहा हंगामात लाखो संगीतप्रेमींनी हजेरी लावत महोत्सवाचे साक्षीदार बनले होते. अनेक संगीतप्रेमी तर दर वर्षी आवर्जुन सुला फेस्टला भेट देत असतात. अशा संगीतप्रेमींची प्रतिक्षा आता संपली असून 3 व 4 फेब्रुवारी 2018 ला होणाऱ्या सुला फेस्टचे तिकीट बुक माय शोद्वारे खरेदी करता येणार आहे. नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेला यंदाचा फेस्ट भरपुर नवीन गोष्ट रसिकांपुढे आणणार आहे. फेस्टमध्ये शंभरहून अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंत आपली कला सादर करण्यात उत्सुक आहेत. वेगवेगळ्या 25 शैलीत 30 देशांतील कलाकार आपली कला सुलाच्या व्यासपीठावरुन सादर करणार आहेत.

इतकेच नाही तर सुलाच्या जगप्रसिद्ध वाईनच्या जोडीला जगभरात नावाजलेल्या ब्रॅंड्‌सच्या 30 हून अधिक वाईन, स्पीरीट्‌सचा समावेश सुला फेस्टमध्ये असणार आहे. तर हेडलायनरबाबत सांगायचे झाल्यास प्रसिद्ध इंग्लीश इलेक्‍ट्रोनिक फोक बॅंड क्रीस्टल फायटर्स भारतात पहिले सादरीकरण करतांना 2018 च्या सुला फेस्टचा हेडलायनर ठरणार आहे. अनेक पुरस्कार
जिंकलेला पारोव्ह स्टेलर आका, ब्रिटीश बॅंड द बीट फिट, रॅंकींग रोजर, गिप्सी हिल यांच्यासह बाऊचक्‍लाग अशा नामांकित बॅंड्‌सचे सादरीकरण संगीत महोत्सवातून पाहण्याची संधी मिळणार आहे. प्रसन्न करणारे संगीत ऐकण्यासोबत वाईन अन्‌ लज्जतदार पदार्थांची मेजवानी जीवन परीपूर्ण बनविणारा अनुभव देणारी ठरणार आहे.
हेडलायनर विषयी...
नामांकित इंग्लीश इलेक्‍ट्रॉनिक फोक बॅंड क्रिस्टल फायटर त्यांच्या अनोख्या संगीत शैलीविषयी प्रसिद्ध आहे. जगभरातील नावाजलेल्या संगीत महोत्सवामध्ये सादरीकरण केल्यानंतर हा बॅंड सुलाच्या व्यासपीठावरही येतोय. तसेच विविध पुरस्कार विजेता पारोव्ह स्टेलर आका यानं इलेक्‍ट्रो स्वींग या शैलीचा शोध घेतलाय. तसेच संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्‍तींसोबत योगदानदेखील दिलय. त्यांत टोनी बेनेट, लेडी गागा, मारर्विन गये, लाना डेल रे, अरोप चुपा व यांसारख्या अनेक नावांचा समावेश आहे.
ब्रिटीश बॅंड द बिट फिट रॅंकींग रोजरच्या सादरीकरणाचा अनुभव अन्य कुठेही न मिळणारा आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटात संगीत देणाऱ्या या बॅंडच्या सादरीकरणाचा अनुभव सुला फेस्टमध्ये घेता येणार आहे. ऑस्ट्रीयाचा बऊचलॅंग आपल्या बिटबॉक्‍स कौशल्यानं जगभर ओळखला जातो. बाऊचलॅंग कधीही न ऐकलेल्या अशा सुमधुर संगीताची अनुभूती देतो. तर गॅस्पी हिल बॅंड बालकन ब्रास, मेडीटरेशन सर्फ रॉक, स्का व स्वींग यांचे मिश्रण होय. गिटार, हॉर्नस्‌ टुबा, स्क्रॅच डीजे व अन्य इलेट्रॉनिक बिट्‌ससह हा
बॅंड सुंदर असे सादरीकरणास सज्ज झाला आहे. युके व अमेरीकेतील भव्य अशा फेस्टीव्हल्समध्ये बॅंडचे सादरीकरण झालेले आहे.


यावर अधिक वाचा :

भारताने निदाहास चषक जिंकला

national news
भारताने निदाहास चषक जिंकला. श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये कार्तिकने ...

मनसैनिकांचे मुंबई-अहमदाबाद मार्गावर आंदोलन

national news
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवरून ...

राहुल द्रविडची झाली फसवणूक, ४ कोटीला गंडावले

national news
भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं बंगळुरूमधल्या एका कंपनीविरोधात सदाशीव पोलीस ...

चार दिवस बँकांना सुट्या

national news
येत्या २९ मार्च ते १ एप्रिल हे चार दिवस बँकांना सुट्या आहेत. २९ मार्चला महावीर जयंती, ३० ...

पृथ्वीवरचा नरक- हेल

national news
पुण्यवान माणूस मरणानंतर स्वर्गात जातो, पापी नरकात जातो असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

national news
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही ...