testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भाजपा अपयशी आहे, दुष्काळ जाहीर करा - सुप्रिया सुळे

supriya sule
Last Modified गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:13 IST)
पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबाबत सरकार अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत असल्याचे सुप्रिया सुळे
म्हणाल्या आहेत.
रुपयाचा दर इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव व सुशिक्षित बेरोजगार हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे. आपण नोटबंदी करुन कोणता काळा पैसा बाहेर काढलात. नोटा छापण्यासाठी लागलेला पैसा जर एसटी प्रशासनाच्या वापरात आणला असता तर चांगले झाले असते, असेही खा. सुळे म्हणाल्या. एरंडोल तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.पदासाठी कोणीही लिंगभेद करु नये. जे कर्तव्यदक्ष आहेत व संवेदनशील आहेत त्यांना पद बहाल करू, असे त्यांनी सांगितले. मी टू हे जनआंदोलन होत आहे. हा विषय गंभीर आहे याची संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे आहे. सरकारने याची हाताळणी व्यवस्थित करावी, अशी मागणी त्यांनी केली.जळगाव भेटीला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनाच बैठकीतून बाहेर काढणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. हा त्या लोकप्रतिनिधी व त्या मतदारसंघाचा अपमान आहे. मुख्यमंत्री जो कोणी होईल त्याला संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असणे गरजेचे आहे. पण या सरकारला सत्तेची मस्ती आहे. त्यांच्याच पक्षाचा आमदार मुली उचलण्याची भाषा करतो व त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, या बाबत त्यांनी संताप व्यक्त केला.आज ५० तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही तरी हे सरकार दुष्काळ जाहीर करण्यास तयार नाही. पाणी कमी झाले आहे म्हणजेच दुष्काळ नाही असे मुख्यमंत्री सांगतात. एवढे असंवेदनशील हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...