मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (12:31 IST)

टाटा मोटर्सची नवी एंट्री लेवल हैचबैक कार बाजारपेठेत, Maruti Wagonr ला स्पर्धा देईल

टाटा मोटर्सने गतवर्षी केलेल्या घोषणे प्रमाणे कि वाहन क्षेत्रात मंदी असूनही कंपनीतून कामगारांना कामातून काढणार नाही किंवा कामगार काम सोडणार नाही. त्याचे कारण असे आहे कि यंदाच्या वर्षी कंपनी बरीच नवीन वाहने बाजारपेठेत आणणार आहे. त्यामुळे कंपनीस मोठं नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी कंपनी कारींच्या दुनियेत ह्या वर्षी नवे मॉडल्स सादर करणार आहे. 
    
अहवालानुसार टाटा मोटर्सची ही नवीन मोटार त्याच्या Alpha Plateform वर आधारित असणार आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या डिझाइन  आणि वेगवेगळ्या इंजिन जसे 7.7 मीटर ते 3.3 मीटरच्या पर्यायांसह असणार आहे. 
 
टाटा मोटर्स एक एंट्री लेव्हल टॉलबॉय हॅचबॅक कार तयार करीत आहे. जी नवीन अल्फा प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ही नवीन कार Tata Tiago (टाटा टियागो)च्या श्रेणीत उपलब्ध असून मारुती Maruti Wagonr ला स्पर्धा करेल.
   
या अहवालात असे म्हटले आहे की टाटा कडून या नव्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कारचे अधिकांश पार्टस टियागो आणि कंपनीच्या Mini SUV H2X  कडून मिळतील. या हॅचबॅक कारमध्ये टियागोत वापरला जाणारा BS6 कंप्लायंट 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देऊ शकतात. 5-स्पीड मॅन्युअल और ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्यायदेखील मिळण्याची शक्यता आहे.
 
किंमत
टाटा आपल्या नवीन हॅचबॅक कारची किंमत Maruti Wagonr आणि Hundai santroपेक्षा किंचित कमी ठेवणार आहे. टाटा पुढील वर्षात ही एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार बाजारपेठेत आणेल.