शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

लिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज

नाव : लिफ्टमेन [कधी अप कधी डाउन]  
शैली : विनोदी 
भाषा: मराठी  
भाग: 10 
समयावधी : 22 मिनिटे 
ZEE5 वर दिनांक 20/07/2018 ला प्रदर्शित लिफ्टमेन [कधी अप कधी डाउन] ही भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीजआहे. या निमित्ताने भाऊ कदम प्रथमच वेब सिरीज मध्ये काम करत आहेत.
 
 
ही मालिका प्रसंगोचित विनोदावर आधारित असून यात भाऊ कदम यांनी लिफ्टमेनची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या ट्रेलरमध्ये आपण अतिशय सुंदर सर्व सुविधा युक्त लिफ्टचे दार उघडत असताना बघतो आणि
एक मजेदार दिसणारा स्टूलवर बसलेला भाऊंचा चेहरा दिसतो.
 
लिफ्टमेन हा बोलक्या व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती असून अतिशय विनोदी पद्धतीने वागतो. हा लिफ्टमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीसोबत संभाषण करत असतो आणि त्यातूनच प्रसंगोचित विनोद निर्माण होत असतो. लिफ्टमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीसोबत बोलण्याची त्याला उत्सुकता असते. यात भाऊच्या भोळसटपणामुळे त्यांच्या लिफ्टमध्ये येणार्‍या पाहुण्यांसोबत होणारे संभाषण मजेदार परिस्थिती निर्माण करत असते. लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे काय परिस्थिती निर्माण होईल? भाऊंची लिफ्टमेनच्या
भूमिकेत कल्पना केली तर त्यामुळे निर्माण होणारी मजेदार परिस्थिती या मालिकेला विनोदाच्या उच्च स्तरावर घेऊन जाण्यास मदत करेल.
 

Facebook

हा शो 8 ते 10 मिनिटांच्या अल्प कालावधीचा असून तो प्रेक्षकांना त्यांच्या विनोदामुळे एका वेगळ्याच विनोदी प्रवासावर घेऊन जाईल. लिफ्टमेनचा प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांसोबत असेल.

ही मालिका प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना लक्ष्य करून आणि जे व्यक्ती निखळ तणावमुक्त मनोरंजनाच्या शोधात आहेत त्यांनाच लक्ष्य करून तयार करण्यात आली आहे. ही मालिका फक्त भाऊ कदम यांच्या भोळसट विनोदामुळे आणि उत्स्फूर्त प्रसंगोचित प्रतिसादाकरिता प्रेक्षक बघतील.
भाऊ कदम हे मराठीतील नावाजलेले नट आणि अतिशय ख्यातप्राप्त व्यक्तिमत्त्व असून त्यांना प्रत्येत वयोगटातील प्रेक्षक हा ओळखतो आणि त्यांची खूप मोठी फॅन फॉलोईंगपण आहे.