testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सिनेमाच्या सेटवरून दोन कोटी रुपये लंपास...स्पॉटबॉयची करामत

charan more
मुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आवश्यक असणारी दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाला आहे. चित्रपटाच्या एका सीन साठी दिग्दर्शकाने नकली नोटांऐवजी खऱ्याखुऱ्या नोटांची मागणी केली. सीन अधिक उठावदार होण्यासाठी आवश्यक असलेली दिग्दर्शकाची मागणी निर्मात्याने पूर्ण करण्याचे ठरविले. इतक्या मोठ्या रकमेची ने-आण सुरक्षितपणे व्हावी, तसेच कुणाला संशय येऊ नये म्हणून निर्मात्याने एक रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंकेत दोन कोटी रोख रक्कम भरून ह्या सर्वप्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या एका विश्वासू स्पॉटबॉयच्या हवाली केली. बराच वेळ सेटवर ‘तो’स्पॉटबॉय न पोहोचल्याने शोधाशोध सुरू झाली आणि अखेर ती रंगीबेरंगी पत्र्याची ट्रंक घेऊन ‘तो’स्पॉटबॉय फरार झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘त्या’स्पॉटबॉयचे नाव चरण चंद्रकांत मोरे असून ‘तो’मूळचा चिपळूण तालुक्यातील आहे. चरण चंद्रकांत मोरे हा अत्यंत साधा-सरळ तसेच गरीब स्वभाव असलेला, नाकासमोर चालणारा मुलगा असल्याने प्रोडक्शन मॅनेजरच्या सांगण्यावरून निर्मात्याकडे त्याला ‘ती’ट्रंक आणण्यासाठी पाठवल्याचे समजते. इतके होऊनही निर्मात्याने अजुनही पोलीसात तक्रार दाखल केलेली नाही. या कृत्याबद्दल चित्रपटसृष्टीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
व्हॉट्सॲपवरून चरणचे आणि ‘त्या’ट्रंकेचे फोटो वायरल होताच, ‘ती’ट्रंक घेऊन एकजण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फिरताना दिसल्याची माहिती मिळाल्याने त्यादिशेने काही माणसे चरणला शोधण्यासाठी निर्मात्याने पाठवली होती, परंतु पुढे काय झाले? हे अद्याप समजलेले नाही.

खरंच, इतक्या मोठ्या रकमेच्या खऱ्या नोटांची गरज होती का? स्पॉटबॉयच्या हातात एवढी मोठी रक्कम कशी काय दिली? अशा अनेक चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहेत. भोळ्या भाबड्या सरळमार्गी चरणने असे का केले? आजवर कधीही कोणती तक्रार नसलेला चरण असा का वागला? या कारनाम्यामागे दुसऱ्या कुणाचा हात तर नाही ना? दोनशे रूपये खर्च करायची अक्कल नसलेला चरण इतकी मोठी रक्कम घेऊन काय करेल? कुठे जाईल? ती पेटी घेऊन तो परत येईल का? अशा अनेक प्रश्नांची घालमेल तुमच्या मनात सुरू झाली असेलच. तर ही उत्सुकता, घालमेल आणि कालवाकालव २२ डिसेंबर पर्यंत कायम ठेवा. कारण, या सर्व गोष्टींचा उलगडा 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या, युनीट प्रोडक्शन निर्मित, श्याम माहेश्वरी दिग्दर्शित ‘चरणदास चोर’ह्या मार्मिक विनोदी चित्रपटात होणार आहे. तर येत्या २२ डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन 'चरणदास चोर' अवश्य पाहा.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...