testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

“थिएटर ऑफ रिलेव्हन्स ”नाट्यदर्शनाचा २५ वर्षपूर्ती सोहळा १८,१९,20 डिसेंबर २०१७ रोजी

anhad marathi natak
थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताला १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंगयात्रेची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स”नाट्य दर्शनाने देश-विदेशात आपली जागतिक ओळख, स्वीकृती मिळवली आहे.
१९९० नंतर जागतिकीकरणाचा युग सुरु झालं. त्या जागतिकीकरणात बोललं जात जग जवळ आले खरतर जग जवळ आले. पण, माणसा- माणसातील संवाद कमी झाला. अर्थ कमविण्यासाठी धावपळ वाढली त्यातच मानवी मुल्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली.

१९९० नंतरच्या अर्थहीन होण्याच्या काळात, एकाधिकारशाही आणि वर्चस्ववादी धोरणांच्या काळात, विज्ञान हे तंत्रज्ञाना पुरते सीमित होण्याच्या काळात, केवळ खरेदी- विक्री यांवर भर असण्याच्या या काळात जनतेला त्यांच्या मुद्यांसाठी "चिंतन”करण्यासाठी एका विचार मंचाची आवश्यकता आहे, या जाणिवेने १२ ऑगस्ट १९९२ पासून “थियेटर ऑफ रेलेवंस”हा रंग सिद्धांत जनतेसाठी 'चिंतन मंच' म्हणून उदयास आला.
“थिएटर ऑफ रेलेवंस”चे सिद्धांत :
1. असा रंगकर्म ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.
2. कला, कलेसाठी नसून समाजाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करणारी असावी आणि हि कला लोकांच्या जीवनाचाच एक हिस्सा असावी.
3. कला जी मानवीय गरजांना पूर्ण करेल आणि स्वतःला अभिव्यक्ति माध्यमाच्या रुपात व्यक्त करेल.
4. जी स्वतःतील बदलांच्या माध्यमांचा शोध घेईल, स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे घेऊन जाईल.
5. असा रंगकर्म जो मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे स्रोत वा पद्धती बनेल.
(रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस”चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस”चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस”नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे.)
आज विकासाच्या नावाखाली एकच चढाओढ सुरु झालेली आहे. या चढा ओढीत एकाधिकाराचा सर्वीकडे गोंधळ सुरु झालेला आहे. गर्दीचा आवाज आणि कोलाहल यामध्ये आपला आवाज ,आपल्या अंतकरणातील आवाज हा दबला जात आहे. किंबहुना त्याला दाबण्याचा षड्यंत्र सुरु झालेला आहे. यातच, आज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,
माणसाने “माणूस”म्हणून राहणे हे एक आव्हान झाले आहे. मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “गर्भ”,“अनहद नाद – Unheard Sounds of universe”आणि “न्याय के भंवर में भंवरी”या क्लासिक नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आंतील आवाज ऐकवण्यासाठी, ही तीन कलात्मक नाटके घेऊन येत आहोत.
या तिन्ही नाटकांची प्रस्तुती पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार असून तारीख आणि वेळ पुढीलप्रमाणे :
१८ डिसेंबर रोजी रात्री 8.30
वाजता 'गर्भ' -
" गर्भ " - हा एक संघर्ष आहे आपल्या अस्तित्वाच्या निर्माणाचा, हा संघर्ष आहे माणसाचा "माणूस" म्हणून जगण्याचा, मानवतेला वाचवण्याचा, समाजाने आपल्या सोयीसाठी बनवलेल्या विचार धारणांना तोडून स्वतःकडे पाहण्याचा आणि विश्वाला सुंदर बनवण्याचा! हे नाटक एक सकारात्मक दृष्टीचा निर्माण करतं, जन्म संयोगापासून, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा, रुढीवादी संस्कार, समज, वैचारिक जडत्व हे देखील जन्म घेतात आणि यांपासून कितीही दूर जाण्याचा प्रयज्ञ केला तरी ते आपली पाठ सोडत नाहीत याच जडत्वाला तोडून आपल्याला उन्मुक्तता देते "गर्भ"! या नाटकाच्या माध्यमाने जगभरात होत असलेल्या वंशभेद ,जातिभेद, धर्म, आणि राष्ट्रवादाच्या ओढाताणीत अडकलेल्या किंवा लुप्त होत असलेल्या मानवतेला वाचवण्याची संघर्ष गाथा अतिशय सौंदर्यासह सादर पहायला मिळते.

१९ डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता 'अनहद नाद unheard sounds of universe' -
“अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ”हे नाटक कलात्मक गरजांचा शोध घेतं. जे कला व कलाकाराला उत्पादिकरणाच्या बंधनातून मुक्त करते. कारण, कला हि उत्पाद आणि कलाकार हा उत्पादक नाही आणि जीवन नफा - तोट्याची बैलेंसशीट नाही. याचकरिता हे नाटक, कला आणि कलाकाराला उत्पाद आणि उत्पादिकरणांमुक्त करते. त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जेने उत्तम आणि सुंदर विश्व निर्मिती करण्यासाठी प्रेरित आणि प्रतिबद्ध करते.
२० डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता
'न्याय के भंवर में भंवरी' होणार आहे.
नाटक “न्याय के भँवर में भंवरी”मध्ये मानवी सभ्यतेच्या उदयापासून ते आजतागायत पितृसत्तेतून उगम पावलेल्या शोषणकारी आणि दडपशाही प्रवृत्ती ने स्रीच्या सामाजिक न्याय आणि समतेचा बळी घेतला आहे व कशाप्रकारे ह्या पुरुषप्रधान समाजात परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली स्रीला गुलामीच्या बेड्यात अडकवण्याचे षडयंत्र रचले गेले, याचे सखोल विस्तारित वर्णन आणि विश्लेषण पाहायला मिळते. ह्या नाटकाच्या माध्यमाने पितृसत्ताक व्यवस्थेला आणि समाज रचनेला प्रहार करून ,एका न्यायसंगत आणि समानताप्रिय समाजाची निर्मिती करण्याचा संदेश मिळतो.
मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ”आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल. येथे अनुक्रमे १८ डिसेंबर २०१७ ला रात्रौ ८.३० वा, १९ डिसेंबर २०१७ला सायं. ५.०० वा. आणि 20 डिसेंबर २०१७ रोजी रात्रौ ८.३० वाजता होईल.


यावर अधिक वाचा :

जान्हवी कपूरला सर्वात कमी मानधन

national news
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर सिनेमा 'धडक' चा ट्रेलर रिलीज झालाय. मराठी सिनेमा ...

'भारत' साठी प्रियंकाने इतके घेतले मानधन

national news
सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. आता तिने 'भारत' या सिनेमासाठी ...

पुन्हा चर्चेत आली आएशा टाकिया

national news
बॉलिवूडमधून बर्‍याच दिवसांपासून गायब झालेली अभिनेत्री आएशा टाकिया खूप दिवसांनंतर ...

'रेस ३' सोशल मीडियावर लीक

national news
रेस ३ हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाला आहे. मल्टीस्टारर अॅक्शनपट असणाऱ्या रेस ३ चं ...

माझ्या सख्या.....

national news
अशा कशा माझ्या सख्या... कुणालाही न कळतील अशा. कुणी खूप बोलघेवडी सुसाट बोलत सुटते वेडी